Thursday, May 14

Tag: to make child marriage free district

make child marriage free district : बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी -NNL

make child marriage free district : बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी महिला बाल विकास विभाग, युनिसेफ एसबीसी 3 च्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लग्न लावू नयेत ते केल्यास काय शिक्षा होवू शकते हे सर्वांना माहिती पाहिजे. यासाठी कायदयाची जनजागृती व प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रशांत थोरात, मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक संतोष शेटकार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पांचगे, डॉ. विद्या झिने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी. पवार, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, स्वामी रामानंद तीर्थ...
error: Content is protected !!