Illigally Gutakha Transporting ; अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर उस्माननगर पोलीसांनी केली कारवाई
उस्माननगर, माणिक भिसे। मारतळा येथुन गोळेगावकडे मोटार सायकलवर येणा-या इसमास गोळेगाव फाटा येथे छापा टाकून चौकशी केली आसता अवैधरित्या गुटखा वहातूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने दाताळा येथील संतोष बोरलेपवार याच्या ताब्यातील मोटार सायकलवरील गुटखा व मोटार सायकलसह ७२, ३०० रू.मुद्देमाल उस्माननगर पोलीसांनी गुप्त बातमीदार यांच्या माहितीवरून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन संबंधित इसमावर कारवाई करण्यात आली आहे .
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय करणारे लोकांवरती कार्यावाही करण्या बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने एम. डी. मुळीक सहायक पोलीस निरीक्षक पो.स्टे. उस्माननगर व सोबतचे अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेवुन अवैध धंद्यावर केसेस करणे कामी रवाना झाले. दरम्यान मौजे गोळेगाव फ...
