Friday, June 26

Tag: Theft at Mahadev Temple

Thift Arested : महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरी; मरखेल पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Thift Arested : महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरी; मरखेल पोलिसांकडून आरोपी जेरबंद

क्राईम, तेलंगणा, नांदेड
देगलूर/नांदेड| देगलूर तालुक्यातील माळेगाव (मक्ता) येथील महादेव मंदिराची दानपेटी फोडून पैसे चोरणाऱ्या आरोपीला मरखेल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च ते ७ मार्च २०२६ दरम्यान माळेगाव (मक्ता) येथील महादेव मंदिरात अज्ञात व्यक्तीने दानपेटी फोडून त्यातील अंदाजे सात हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी मंदिराचे पुजारी रवि संग्रामअप्पा मदपती (वय २२) यांनी मरखेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४२/२०२६ अंतर्गत भादंवि कलम ३३४(१) व ३०५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार राजू पि. किशन शिवरे (वय ३०, रा. कतलवाडी, मंडळ जुक्कल, जिल्हा कामारेड्डी, राज्य तेलंगणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने ...
error: Content is protected !!