Thursday, May 14

Tag: The work of silvering the arch of Shri Parameshwar Murti

हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मूर्तीच्या कमानीला चांदीची झळाळी लावण्याचे काम सुरु -NNL

हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मूर्तीच्या कमानीला चांदीची झळाळी लावण्याचे काम सुरु -NNL

नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ - तेलंगणाच्या मध्यभागी असलेल्या महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. सव्वासातशे वर्ष जुने असलेल्या श्री परमेश्वर मंदिरात हरिहर रूपातील श्री परमेश्वराची उभी मूर्ती भुयारामध्ये स्थापन आहे. श्री परमेश्वर मूर्ती काळ्या पाषाणातील दगडावर कोरलेली असून, मूर्तीच्या बाजूने असलेल्या संगमरवरी दगडाच्या कमानीवर मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या देखरेखीखाली चांदीचा पत्रा व छत्री लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चांदीच्या नक्षीकामामुळे मूर्तीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या देवीदेवतांच्या मूर्तीसाठी चांदीच्या, सोन्याच्या प्रभावळ, सिंहासन बनविले जात असल्याचे आपण ऐकलं आहे. त्याचं धरस्तीवर आता श्रीक्ष...
error: Content is protected !!