Saturday, June 27

Tag: The Vadari community

Sambhaji anna Devkar : नांदेड वाघाळा महानगरपालिकेत वडार समाजाला स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व द्यावे – जिल्हाध्यक्ष संभाजी अण्णा देवकर

Sambhaji anna Devkar : नांदेड वाघाळा महानगरपालिकेत वडार समाजाला स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व द्यावे – जिल्हाध्यक्ष संभाजी अण्णा देवकर

नांदेड, राजकीय
नांदेड | नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करून आपापले नगरसेवक निवडून आणले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत वडार समाजाला पुन्हा एकदा प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्यात आले, अशी खंत वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष संभाजी अण्णा देवकर यांनी व्यक्त केली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासाकडे पाहिले असता, वडार समाजाला कोणत्याही पक्षाने थेट उमेदवारी देऊन सन्माननीय पद दिल्याचे उदाहरण नाही, असे देवकर यांनी सांगितले. नांदेड शहरात वडार समाजाची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक असूनही, महापालिका निवडणुकीत समाजाला प्रतिनिधित्व न मिळणे ही अन्यायकारक बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवकर यांनी नमूद केले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी वडार समाज गेल्या अनेक वर्षांपासून खंबीरपणे उभा आहे. असे असतान...
error: Content is protected !!