Thursday, June 25

Tag: The road on the

The road : ढाणकी मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प — महिनाभरानंतरही दुरुस्तीचा मागमूस नाही

The road : ढाणकी मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प — महिनाभरानंतरही दुरुस्तीचा मागमूस नाही

नांदेड, यवतमाळ, सोशल वर्क
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर ते ढाणकी या मार्गावरील मुख्य रस्ता गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचला असून, अद्यापही त्याकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीचा सण सुरू असतानाही या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. उमरखेड–ढाणकी–गांजेगाव–हिमायतनगर–पळसपूर–डोलारी–सीरपली–गांजेगाव–उमरखेड या मार्गावरील एस.टी. बससेवा रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आली आहे. परिणामी, शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, आमदार आणि खासदारांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हिमायतनगर कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू आहे. कार्यालयात गेल्यास अधिकारी वारंवार अनुप...
error: Content is protected !!