The punctuality of the dutiful Railway ; कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेने वाचवला प्रवाशाचा प्राण – NNL
नांदेड| नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेमुळे पलॉटफॉर्म क्रमांक 1 वरील धाव पट्टी वरून निघालेल्या धावत्या जलदगती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नांत असताना सदरील प्रवाशाचा तोल ढासळला व प्लॉट फॉर्म व रेल्वेच्या मधील फटीत अडकलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्यात कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांनी यश मिळवले आहे.
प्लॉटफॉर्म क्रमांक 1 वर 17611 दिनांक 04.09.2024 रेल्वे सुरक्षा बल नांदेड ठाण्याचे निरीक्षक विनोदकुमार मीना यांच्या आदेशानुसार अधिपत्याखालील नांदेड रेल्वे ठाण्याचे एम.माधवराव उपनिरीक्षक PSI/RPF/NED व व्ही.डी.कांबळे कॉन्स्टेबल - 089 रेल्वे स्थानकावर प्लोटफॉर्म क्रमांक 1 वर कर्तव्य बजावत होते. दरम्यान जलदगती रेल्वे क्रमांक 17611 ही पलोटफोर्म क्रमांक 1 वरून जात असताना नांदेड जिल्हयातील रामराव नागोराव सोनकांबळे वय वर्ष 47 रा. जरिकोट तालुका धर्माबाद ये...
