Accused rested : गोरगरिबांची 1,85,37,754 रुपयांपेक्षा अधिक फसवणुक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक
नांदेड| "छञपती शिवाजी महराज बहुउद्देशीय सेवाभवी संस्था, धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही संस्था महाराष्ट्र शासनाची आहे. असे भासवून गोरगरीब मजूर लोकांची 1,85,37,754 रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणुक करणारा मुख्य सुत्रधार आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी लातूर येथे नवा बदलून राहत असल्याचा शोध लावून ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यात एकुण 13 आरोपी होते. यापुर्वी चार आरोपीतांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तर सहा आरोपीतांची अटकपूर्व जामिन झालेला आहे व एक आरोपी मयत झाले अशी माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गुन्ह्यातील फिर्यादी अनिल गुणाजी पाईकराव वय 34 वर्षे मोटर सायकल मेकॅनिक रा, वैशाली नगर नांदेड यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड येथे तक्रार देऊन बाबासाहेब शंकर सुतारे याने साथीदारांच्या ...
