Artificial intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार – प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन
नांदेड| बँक किंवा सहकारी संस्थांनी स्वतःला सातत्याने अद्यावत ठेवणे हे विकासाचे लक्षण असून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे हा सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित साधनांचा प्रभावी वापर केल्यास बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी केले.
ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित AI प्रशिक्षण कार्यकारी विकास कार्यक्रमाच्या (Executive Development Program) अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोसायटीचे सेक्रेटरी श्री. रवींद्र रक्ते, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, श्री. हर्षद शहा, डॉ. शैलेश वाडेर, डॉ. सुरेंद्रनाथ रेड...
