जिल्हाधिकाऱ्यांनी राहाटी गावाला भेट देवून पशुसंवर्धन विभागाच्या विविध कामांची केली पाहणी शेतकरी व पशुपालकांशी साधला संवाद
नांदेड l नांदेड तालुक्यातील नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखानाच्या कार्यक्षेत्रातील राहाटी (बु.) या गावाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करुन शेतकरी व पशुपालकांशी #संवाद साधला.
जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय दुध विकास मंडळ, दिल्ली (एनडीडीबी) मार्फत पुरविल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतन सुविधांची तपासणी केली. कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेल्या कालवडीची पाहणी करून पशुपालकांनी या अत्याधुनिक सेवांचा अधिकाधिक लाभ घेवून आपल्या घरीच उच्च वंशावळीच्या कालवडी तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत सुरू असलेल्या दिगंबर के. बोकारे यांच्या पनीर निर्मिती उद्योगाची पाहणी करत त्यांनी उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता आणि बाजारपेठेची माहिती घेतली. सदर शेतकरी दररोज गावातच उत्पादन झालेल्य...
