BJP News: हिमायतनगर नगरपंचायतमध्ये भाजपने खाते उघडले; निवडणुकीत ‘मोठा भाऊ’ ठरला भाजप
हिमायतनगर, अनिल मादसवार| नुकत्याच पार पडलेल्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीन जागांवर विजय मिळवत खाते उघडले आहे. या निकालामुळे हिमायतनगरच्या राजकारणात भाजपला निर्णायक बळ मिळाले आहे.
आजवर हिमायतनगर तालुक्यात भाजप केवळ नावालाच अस्तित्वात होती. मात्र अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जिल्हा भाजपमय करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांना या निवडणुकीत फळ मिळाले, हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र वानखेडे यांच्यासह एकूण दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते, त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली होती.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी दर्शना शरद चायल, आशिष सकवान आणि भारत डाके हे तिन्ही उमेदवार मताधिक्याने निवडून आल्याने हिमायतनगर न...
