Kinwat ; प्रगती लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
किनवट/माहूर l महाराष्ट्र शासन अंगिकृत महिला आर्थिक विकास महामंडाळच्या अधिनस्त लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने आज दि. ७ ऑक्टो. रोजी बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा किनवट येथे महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत संपन्न झाली असून ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करण्यासाठी महिलांना विविध प्रकारच्या योजनांची माहीती देण्यात आली.
आज दि. ७ ऑक्टोबर रोजी किनवट येथील साईमंदीराच्या सभागृहात पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी प्रगती लोकसंचालित साधन केंद्र च्या प्रभावती शेंडे होत्या.. तर ICICI बँकेचे बचतगट मॅनेजर अनिल इंगोले, यांच्यासह राहूल शिंदे व्यवस्थापक सावित्री CMRC नांदेड, श्रीमती रमा दामोदर, व्यवस्थापक अर्धापूर, श्रीमती सुकेशना कपाटे, श्रीमती कमलाताई देशमुख, लेखापाल सिद्धीकी अझहर यांच्यासह अनेकांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती.
तत्पुर्वी महिलांच्...
