District Collector Kardile : जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले
नांदेड| जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलन ही चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन बालविवाह निर्मूलन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, पंचायत, आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), उमेद या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला “बालविवाह मुक्त नांदेड जिल्हा” हा कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” ची नियुक्ती केली आहे. या सर्व विभागाच्या चॅम्पियन्ससाठी एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेचे 28 मे रोजी हॉटेल सिटी सिंफोनी नां...
