S.P. Avinash Kumar : हदगाव–हिमायतनगर तालुक्यावर माझे विशेष लक्ष राहील – पोलीस अधीक्षक अविनाश कुमार
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव व हिमायतनगर तालुक्यात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत. तसेच डीजेला अनावश्यक परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट मत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी व्यक्त केले.
२१ ऑगस्ट २०२५ रोजी हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीची बैठक व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गोपाळ सारडा, कृष्णा पाटील, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, महावितरणचे अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले की, "गुन्हा हा साधा असो वा गंभीर, तो आता हलक्यात घेण्याची वेळ राहिलेली नाही. एका क्लिकमध्ये तुमचा संपूर्ण गुन्हेगारी इतिहास कंपन्यांना दिसतो. त...
