Venkatesh Chaudhary : प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहून काम करावे – व्यंकटेश चौधरी -NNL
नांदेड। प्रतिकूल वातावरणातसुद्धा सकारात्मक राहून अनुकूलता निर्माण करून भविष्यवेधी शिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.
वाजेगाव (ता. नांदेड)ची ऑगस्ट महिन्याची पहिली केंद्रीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे दि. १४ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. विविध उपक्रम आणि गुणवत्ता वर्धन यांत अग्रेसर असणाऱ्या अक्षर परिवारात सामाजिक बांधिलकी जपून संपूर्ण जगासमोर वेगळा आदर्श निर्माण करणारे आदर्श कुटुंब म्हणजे ढोके कुटुंब असेही व्यंकटेश चौधरी यांनी मत व्यक्त केले.
संवेदनशील अक्षर परिवाराने स्वर्गीय अभिजीत ढोके असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळाकोळी यांच्या दुर्दैवी अपघातानंतर ब्रेन डेड अवस्थेत असतांना अवयवदान करण्याचा संकल्प करून हृदय, फुफुस, किडनी, यकृत, डोळे या अवयवांचे दान कर...
