Sunday, May 24

Tag: State-of-the-art CT scan and MRI services

Atul save : नांदेडकरांना दिलासा! शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन–एमआरआय सेवा सुरू

Atul save : नांदेडकरांना दिलासा! शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन–एमआरआय सेवा सुरू

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सेवेत मोठा दिलासा देणारा टप्पा आज गाठण्यात आला. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचे लोकार्पण राज्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, “या सुविधेमुळे नांदेड जिल्ह्यातील गरीब, गरजू व सामान्य रुग्णांना आता खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागणार नाही, माफक दरात आणि दर्जेदार तपासणी शासकीय रुग्णालयातच उपलब्ध होईल.” आरोग्य सेवेत ऐतिहासिक पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पीपीपी तत्त्वावर नऊ ठिकाणी सिटीस्कॅन व एमआरआय सुविधा सुरू करण्यात येत असून, नांदेडला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व...
error: Content is protected !!