customer fraud exposed : स्टार हेल्थ इन्शुरन्सची ग्राहक फसवणूक उघड – पहिल्याच क्लेमला टाळाटाळ, खोट्या आश्वासनांचा पाढा
नांदेड| आरोग्य विमा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीविरोधात गंभीर आरोप उघड झाले आहेत. कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि परतावा प्रक्रिया विलंबित करून ग्राहकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
गायत्री स्वामी या विद्यार्थिनीला 104 अंश फॅरेनहाइट ताप आल्यामुळे तिला शिवाजीनगर, नांदेड येथील एका बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हे रुग्णालय स्टार हेल्थच्या मान्यताप्राप्त यादीत नसल्याने, कंपनीच्या प्रतिनिधींनी बिलाचा परतावा 8 दिवसांत मिळेल असे आश्वासन दिले. परंतु अनेक दिवस उलटूनही परतावा मिळालेला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे, कंपनीच्या प्रतिनिधींनी असेही सांगितले की, “ताप आल्यावर रुग्णाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची गरज नाही.” सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ स्वामी यांनी सांगितले की, “मागील 4 वर्षांपासून मी सतत पॉलिसीचे हप्ते भरत आहे. एकही क्लेम दाखल केल...
