Tuesday, May 26

Tag: Spontaneous response to free eye check-up camp

free eye check-up camp : नंदी महाराज देवस्थान कवाना यात्रेत मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

free eye check-up camp : नंदी महाराज देवस्थान कवाना यात्रेत मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य, नांदेड
हदगाव| नंदी महाराज देवस्थान कवाना येथे भरलेल्या यात्रेच्या निमित्ताने लायन्स इंटरनॅशनलच्या सामाजिक बांधिलकीतून लायन्स क्लब ऑफ नांदेड मिडटाऊनच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला यात्रेतील भाविकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दत्तात्रय विश्वनाथ हुरणे प्रतिष्ठान आपल्या परंपरेचा पाया असलेला ७५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास पूर्ण करून अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, लायन राजेंद्र हुरणे व मिसाळे परिवाराच्या वतीने स्व. विश्वनाथ आप्पा हुरणे यांच्या स्मरणार्थ हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १७२ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या सोयीप्रमाणे रुग्णालयात बोलावून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात रुग्णालयातील गजानन व कोमल ...
error: Content is protected !!