Friday, June 26

Tag: should be considered

Dr. Sanvi : डॉ. सान्वी जेठवाणी यांचा स्वीकृत सदस्य म्हणून विचार व्हावा

Dr. Sanvi : डॉ. सान्वी जेठवाणी यांचा स्वीकृत सदस्य म्हणून विचार व्हावा

नांदेड, राजकीय
नांदेड| भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. सान्वी जेठवाणी यांचा विचार व्हावा, अशी जोरदार मागणी नांदेडमधील विविध कलावंत, सिंधी समुदाय तसेच अनेक समाजसेवी संस्था व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. डॉ. सान्वी जेठवाणी या उच्चशिक्षित तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, नामवंत कलावंत व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्र शासनाने स्वीकृत सदस्य पदासाठी निश्चित केलेले सर्व निकष त्या पूर्ण करीत असून त्यामुळे त्यांचा योग्य विचार व्हावा, असे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. समाजसेवेच्या माध्यमातून डॉ. जेठवाणी यांनी युवकांना सोबत घेऊन रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, आरोग्य व संवेदनशीलता जनजागृती कार्यक्रम राबवले आहेत. तृतीयपंथी समुदायासाठी शिक्षण, रोजगार, सन्मान व अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी सातत्याने भरीव कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल...
error: Content is protected !!