Gopal Maharaj Agarwal Group : सुंदर बतकम्मा स्पर्धेत गोपाल महाराज अग्रवाल ग्रुपला प्रथम पुरस्कार; शाहीर रमेश गिरी यांनी रसिकांची मने जिंकली
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या पुढाकाराने गेल्या सात वर्षांपासून पारंपरिक उत्साहात साजरा होणारा बत्कम्मा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षीच्या सुंदर बतकम्मा सजावटी स्पर्धेत गोपाल महाराज अग्रवाल ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला, तर महेश आऊलवार ग्रुप द्वितीय, आणि संध्याराणी बादावार ग्रुप तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या कार्यक्रमात शाहीर रमेश गिरी यांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांच्या लोककला आणि समाजजागृतीवर आधारित सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस विधानसभा निरीक्षक दिनेश नवघरे, रामदास पाटील सुमठाणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती दादा कांबळे, माजी उ...
