Mla. Prataprao Patil Chikhlikar : स्काऊट-गाईडमधून शिस्त, स्वावलंबन व सहकार्याची जीवनमूल्ये मिळतात – प्रतापराव पाटील चिखलीकर
लोहा| स्काऊट-गाईड चळवळीतून विद्यार्थ्यांना शिस्त, स्वावलंबन व सहकार्य ही मूलभूत जीवनमूल्ये मिळतात. आजच्या काळात ही मूल्ये अधिक बळकट होण्याची गरज असून अधिक शाळा व अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढायला हवा, असे मत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.
लोहा-पारडी येथील सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळा मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय ५१ व्या स्काऊट-गाईड मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात पार पडले. या मेळाव्यात ५१ शाळांचे ६० तंबू उभारण्यात आले असून जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा नगराध्यक्ष शरद पाटील पवार होते. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (प्रा.) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, राज्य प्रदेश सचिव अँड मुक्तेश्वर धोंडगे, युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब त...
