Scam of crores : लोह्यातील श्रीमती आर जी वैराळे मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटीत करोडोचा घोटाळा
लोहा/नांदेड। जिल्ह्यातील लोहा येथे श्रीमती आर. जी. वैराळे मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा घोळ (Scam of crores) झाल्याची तक्रार 8 पिग्मी एजंटांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांच्याकडे दिली आहे.
लोहा येथे श्रीमती आर. जी. वैराळे मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी कार्यरत होती. त्यात पिग्मी एजंट या पदावर सचिन भानुदास मुडसे, मंगेश मारोती वंजारे, शेख सिकदर शेख बाबु, हनमंत मनोहर कागणे, गोविंद हरीभाऊ पवार,अनिल किशनराव वट्टमवार हे कार्यरत होते. सोसायटीने त्यांना दाखवलेल्या कमिशनच्या लोभात अडकून त्यांनी अनेक सदस्य बनवले. पण त्यांना मिळणारा कमिशनचा भाग आणि गुंतवणुकदारांना मिळण्याचा हक्क मिळत नव्हता. तेंव्हा सध्याचे या सोसायटीचे अध्यक्ष अमोल बाजीराव ढगे, सचिव गजानन उत्तमराव शिंदे, उपाध्यक्ष मनोजकुमार श्रावण दिवेकर, लोहा शाखाचे अध्यक्ष सुनिल भानुदास मैड, सदस्य गौतम गुणाजीराव ...
