Friday, June 26

Tag: Sand smuggling in Bhokar hidden under white dust; Police seize tipper worth seven lakhs

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

क्राईम, नांदेड
भोकऱ | स्थानिक महसूल चुकवून पांढऱ्या डस्टखाली रेती लपवून अवैध वाहतूक करणाऱ्या टिपरवर भोकऱ पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भोकऱमधील हुडके कॉलनी ते बोंगाव पांदन रस्त्यावरून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एमएच-०४ ईवाय-०२६३ क्रमांकाचा टिपर अडवला. तपासणीदरम्यान टिपरमध्ये पांढऱ्या डस्टखाली रेती लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी तपासणी केली असता टिपरमध्ये सुमारे ३ ब्रास पांढरी रेती आढळून आली. याप्रकरणी ७ लाख रुपयांचा टिपर व १५ हजार रुपयांची रेती असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टिपर चालक व मालक रतनाथ रघुनाथ पांचाळ (रा. नायगाव, जि. नांदेड) याच्याविरुद्ध भोकऱ पोलीस ठाण्यात गुन्हा...
error: Content is protected !!