माझ्या मुलाचा घातपात झाला; पाण्यात बुडून मृत्यू झाला नाही – NNL
नांदेड/अर्धापुर। शेणी ता.अर्धापूर येथील सालदार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सौ. सुनीता आणि संजय हातागळे यांच्या १८ वर्षे वय असलेल्या आणि इयत्ता १२ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या ऋतुराजचा २० एप्रिल रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतुराज यास घेऊन गेलेला व मृत्यूची खबर देणारा किंवा त्याचे रक्ताचे नातेवाईक मुलाच्या अंत्यविधीस आले नाहीत किंबहुना त्यांच्या वागणुकीवरून संशय बळावत चालला आहे.
अर्धापूर पोलिसांची कामगिरी आणि निमगाव आरोग्य उप केंद्रातील शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची कामगिरीही संशय निर्माण करणारी आहे. नातेवाईकांच्या मुलाने आमचा मुलगा ऋतुराज यास बोलावून नेले आणि काहीवेळाने फोन करून कळविले की, तुमचा मुलगा चोरंबा कॅनल मध्ये पाण्यात बुडाला आहे. एक रात्र मुलगा पाण्यात होता दुसऱ्या दिवशी मुलाचे प्रेत शोधण्यास यश आले. मुलाच्या पोटात बिल्कुल पाणी गे...
