Sunday, July 5

Tag: Saiphal Zilla Parishad School is not getting टीचर्स

School Teachers : शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : सायफळ जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नाहीत

School Teachers : शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : सायफळ जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नाहीत

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुका शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. माहूर तालुक्यातील सायफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या अक्षरशः अडचणीत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ७५ ते ७६ असून, शाळा पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंत आहे. मात्र या सर्व वर्गांचा भार केवळ एका शिक्षकावर टाकण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून गावकऱ्यांनी कायमस्वरूपी शिक्षक नेमण्यासाठी वारंवार मागणी केली, परंतु शिक्षण विभागाने केवळ तात्पुरते उपाय केले. तक्रार दिल्यानंतर दर महिन्याला नवीन शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात पाठवला जातो, पण काही दिवसांनी तो शिक्षक दुसऱ्या शाळेत हलवला जातो. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होते, आणि अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही. ग्रामस्थांनी सांगितले की, “आमची शाळा ही गावातील मुलांसाठी शिक्षणाचं एकमेव साधन आहे. पण एका शिक्षकाच्या भरोशावर पाच वर...
error: Content is protected !!