Sadashiv Badwane ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदाशिव बडवणे यांना मिळाली उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत !
राज्यातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन लाभावे, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मोठा आधार निर्माण झाला आहे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा आरोग्यपूर्ण जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अनेकदा एखाद्या कुटुंबावर अचानक गंभीर आजाराचा आघात होतो. रुग्णासह संपूर्ण कुटुंबाचा धीर खचून जातो. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज ...
