Dr. Sunil Jadhav : डॉ. सुनील जाधव यांना इंडोनेशियामध्ये दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
बाली/नांदेड। इंडोनेशियातील बाली येथे नुकतेच २३ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित २५ वे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन हे हिंदी साहित्य आणि भारतीय संस्कृतीचा एक भव्य महाकुंभ ठरले. या आयोजनात भारतभरातून आलेल्या अनेक विद्वान आणि साहित्यिकांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप दिले.
या संमेलनात, यशवंत महाविद्यालयाच्या हिंदी विभागात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेले डॉ. सुनील गुलाबसिंग जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील विशेष योगदानासाठी त्यांच्या ‘शोध ऋतु’ या बहुभाषी शोधपत्रिके करिता त्यांना 'ट्रू मीडिया गौरव सन्मान-२०२५' आणि त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी 'डॉ. शरद पगारे स्मृती सन्मान' प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळा आणि पुस्तकाचे प्रकाशन
ट्रू मीडिया गौरव सन्मान-२०२५ त्यां...
