Friday, June 26

Tag: Rumors of earthquake

Rumors of earthquake : भोकर तालुक्यात भूकंपाची अफवा; प्रशासनाचा जनतेला धीर

Rumors of earthquake : भोकर तालुक्यात भूकंपाची अफवा; प्रशासनाचा जनतेला धीर

नांदेड, महाराष्ट्र
भोकर/नांदेड| 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भोकर तालुक्यातील पांडुरणा गावाच्या परिसरात भूगर्भातून आवाज आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. या अनुषंगाने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता कोणत्याही भूकंपाची नोंद आढळून आलेली नाही. याबाबत अधिक सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. टी. विजयकुमार यांच्याकडून तज्ज्ञ मार्गदर्शन घेण्यास सांगितले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले. विशेषतः पत्र्याच्या घरांवर मोठे दगड न ठेवता पत्रे बोल्टने नीट फिट करावीत, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच पुन्हा असा आवाज किंवा धक्का जाणवल्यास नागरिकांनी तत्काळ मोकळ्या जागेत जमा व्हावे व प्रशासनाशी (02462) 235077 या क...
error: Content is protected !!