Rituals of Shivachaitanya Shivacharya Maharaj : हदगावमध्ये शिवचैतन्य शिवाचार्य महाराजांचे श्रावण महिन्यात अनुष्ठान – NNL
हदगाव, शेख चांदपाशा| हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये श्री. महादेव मठ संस्थान, हदगाव येथे नित्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी मठाचे मठाधिपती श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे तृतीय श्रावण मास तपोनुष्ठान आयोजित केले आहे.
अकराव्या शतकात श्री.बसवलिंग महास्वामीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला श्री. महादेव मठ परिसरातील सर्व भक्तमंडळी साठी श्रद्धेचे स्थान आहे. याच ठिकाणी बसवलिंग महास्वामी यांची संजीवन समाधी आहे. दोन वर्षांपूर्वी येथील मठाधिपती लिंगैक्य बसवलिंग शिवाचार्य महाराज शिवैक्य झाल्यानंतर येथील गादीवर श्री. ष. ब्र. 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक झाला. तेव्हापासून महादेव मठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये अकरा दिवसीय तपोअनुष्ठान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याचा प्रारं...
