loudspeakers and amplifiers : ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापरावर नियमन व नियंत्रण
नांदेड l राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
कोणताही व्यक्ती, संस्था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनांवर ध्वनीक्षेप व ध्वनीवर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्वनीप...
