Friday, June 26

Tag: Rampage by Unidentified Vandals in Pardi

Farmers Banana Trees Distroy : पार्डीत अज्ञात माथेफिरूंचा धुडगूस; ५ शेतकऱ्यांच्या ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल

Farmers Banana Trees Distroy : पार्डीत अज्ञात माथेफिरूंचा धुडगूस; ५ शेतकऱ्यांच्या ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल

नांदेड, कृषी
नांदेड /अर्धापूर | नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मौजे पार्डी (म) येथे अज्ञात माथेफिरूंच्या टोळीने शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक १२ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पाच शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेत घुसून तब्बल ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल केली. तसेच ठिबक सिंचन आणि सबलाईनच्या पाईपांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत शेतकरी साईनाथ मारोतराव हापगुंडे (गट क्र. १७९), प्रसाद साहेबराव हापगुंडे (गट क्र. १७९), नवनाथ दतराव हापगुंडे (गट क्र. १२), प्रफुल्ल बाबूराव देशमुख आणि रविकुमार हरीआप्पा पत्रे यांच्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ झाडांची कत्तलच नव्हे तर ठिब...
error: Content is protected !!