Saturday, June 27

Tag: Rahul Patil

Become digital : स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील

Become digital : स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आजच्या युगात डिजिटल साक्षर होणे अत्यंत आवश्यक असून, डिजिटल व्यवहार करताना संपूर्ण माहिती घेऊनच काळजीपूर्वक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल व्यवहार करताना येणारे संदेश तपासणे, फेकलिंक व संशयास्पद ॲप्स ओळखण्यासाठी इंटरनेटवर माहिती पडताळून घेणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळता येईल. युवावर्गाने स्वतः डिजिटल साक्षर व्हावे आणि हीच माहिती घरच्यांपर्यंत पोहोचवून त्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या शलाका ढमढेरे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पव...
error: Content is protected !!