Maharashtra Public Libraries Act Amendment : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम सुधारणा संदर्भातील अहवालाचे सादरीकरण -NNL
मुंबई| कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माहिती आणि ज्ञानाबरोबरच वाचकांना अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अद्ययावत सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम १९७० सुधारणा समितीने आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व समितीचे सदस्य सचिव व प्र.ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड उपस्थित होते.
शाश्वत विकासाची ध्येय साध्य करणे,वाचनसंस्कृती सर्वदूर रुजविणे आणि ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी ग्रंथालयांची गरज वाढलेली आहे. वाढती लोकस...
