Aundha Nagnath ; 147 गावांचे रक्षण करणारे पोलीस वार्यावर; औंढा नागनाथ येथील पोलीस निवासस्थानाची दयनीय अवस्था
औंढा नागनाथ l औंढा नागनाथ येथे सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आज अक्षरशः मोडकळीस आले आहे. काळानुसार या निवासस्थानाची कोणतीही दुरुस्ती न झाल्याने सध्या त्याची अवस्था अत्यंत खस्ता झालेली दिसून येत आहे. निवासस्थानातील दरवाजे, खिडक्या निखळून पडल्या असून भिंतींना मोठमोठी भगदाडे पडली आहेत. अनेक घरांची छपरे उडून गेली असून परिसरात जंगलासारखी झाडाझुडपांची वाढ झाली आहे.
या झाडाझुडपांमुळे निवासस्थान परिसरात जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून पिण्याच्या पाण्याची व नियमित वीजपुरवठ्याची कोणतीही सोय नाही. अशा परिस्थितीत येथे पोलीस कर्मचारी कसे राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवासासाठी इच्छुक असलेले कर्मचारीही येथे राहण्यास तयार नाहीत. परिणामी अनेक पोलीस कर्मचारी बाहेर भाड्याच्या खोलीत राहत असून काहींना रोज बाहेरगावावरून अपडाऊन करावे लागत आहे.
पोलीस कर्म...
