Friday, June 26

Tag: Police Inspector Ganesh Karad

Mahur News : भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य – पोलीस निरीक्षक गणेश कराड

Mahur News : भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य – पोलीस निरीक्षक गणेश कराड

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी | माहूर गडावर सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त लावला असून, आतापर्यंत एकही अपघात, पाकीटमारी किंवा छेडछाडीची घटना न घडल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नियोजनाचे कौतुक होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गडावर श्री रेणुका मातेसह विविध देवस्थानांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. गडावर सुरू असलेल्या लिफ्ट व स्कायवॉकच्या कामामुळे दर्शन पायऱ्यांवर दुहेरी ऐवजी एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे. भाविकांना परतीसाठी परशुराम मंदिराच्या मार्गाने नवीन पायऱ्या तयार करून देण्यात आल्या असून, ही कामगिरी केवळ दोन दिवसांत पूर्ण केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. के. भिसे यांचे कौतुक होत आहे. पायऱ्यांवर प्रत्येक काही अंतरावर पो...
error: Content is protected !!