Mla. Chikhlikar : लोहा मतदार संघात इंजेक्शन व गोळ्या घेतलेला पहेलवान चालत नाही – आ. चिखलीकर -NNL
लोहा| विधानसभा मतदार संघात इंजेक्शन व गोळ्या घेतलेला पहेलवान चालत नाही.दंड व मांड्या थोपटणारे मल्ल कुठे दिसले नाहीत.कोणाला कोणता पेच घालावा लागती .हे गेल्या तीस चाळीस वर्षात आम्हाला कळले आहे राजकीय आखाड्यात मेहनती व कसरत करणारा पहेलवान कुस्ती जिंकत असतो, जनतेनी नेहमीच मदतीला धावून जाणाऱ्या व काम करणान्यां माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास साथ दिली आहे आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.व विकासासाठी निधी कमी पडणार नाही असा विश्वास नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
आष्टूर (ता. लोहा) येथे प्रभु दतात्रय यांच्या यात्रे निमित आयोजित भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली त्या उद्घाटन प्रसंगी आ० प्रतापराव पाटील चिखलीकर बोलत होते. यावेळी युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, माजी पं.स. सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,सचिन पाटील चिखलीकर, स्वप्न...
