Forest department Mahur : रस्त्यावर फेकलेली रोपे जंगलात नेण्यासाठी वन विभागाचा आटापिटा
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद बाबा दरगाह समोरील रस्त्यावर फेकून देण्यात आलेल्या रोपांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाईगडबडीत रात्रीच ट्रॅक्टरमधून ती रोपे जंगलात नेण्याचा आटापिटा सुरू केला. यासाठी जेसीबीद्वारे जंगलातील उभी असलेली अनेक सागवानी झाडे तोडून नवीन रस्ता तयार करत रोपे फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड पालाईगुडाकर यांनी ही बाब स्वतः जंगलात पाहणी करून स्थानिक प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
लाखो रुपयांच्या निधीचा गैरवापर?
गेल्या चार वर्षांपासून वन विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी रोप लागवडीसाठी खर्च करण्यात आला असल्याचे दाखले दाखवले जात आहेत. शेतकऱ्यांची शेते भाड्याने घेऊन रोपवाटिका तयार केल्या; परंतु अनेकांना भाड्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. मजुरांच्या नावावर ...
