Thursday, June 25

Tag: on the Nanded-Adilabad highway

Substandard work Exposed : नांदेड–आदिलाबाद महामार्गावरील हिमायतनगर तालुक्यात निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Substandard work Exposed : नांदेड–आदिलाबाद महामार्गावरील हिमायतनगर तालुक्यात निकृष्ट कामाचा पर्दाफाश

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | नांदेड–आदिलाबाद हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असून, हिमायतनगर तालुक्यातील सोनारी ते पोटा या दरम्यान लवकरच टोल आकारणी सुरू होणार आहे. मात्र टोलपूर्वीच या महामार्गाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ता बांधताना “इतका मजबूत महामार्ग की विमान जरी उतरले तरी काही होणार नाही” अशा दणदणीत वल्गना करण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात काही महिन्यांतच अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे. महामार्गावर ज्या ठिकाणी रोड क्रॅक झाले आहेत, तेथे तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण रस्ता उखडून नव्याने मजबुतीकरण करणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार केवळ वरवरची मलमपट्टी करत असल्याचे चित्र आहे. भेगा सिमेंटने बुजवून काम उरकले जात असल्याने हा महामार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असून, रस्त्यावर पडलेल्या भेगा वा...
error: Content is protected !!