Friday, June 26

Tag: on social media

Poor quality work : हिमायतनगरच्या नडवा पूलावर निकृष्ट दर्जाचे काम सुरू; डस्टमध्ये काँक्रिट, सोशल मीडियातून नागरिकांमध्ये संताप

Poor quality work : हिमायतनगरच्या नडवा पूलावर निकृष्ट दर्जाचे काम सुरू; डस्टमध्ये काँक्रिट, सोशल मीडियातून नागरिकांमध्ये संताप

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा नडवा पूल सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलाच्या बांधकामात रेतीऐवजी डस्टचा वापर केला जात असल्याचे, तसेच नियमानुसार आवश्यक असलेल्या लोखंडी सळ्यांऐवजी ८ मिमी व १० मिमीच्या गजांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. या हलगर्जी कामामुळे पुलाची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोप पुलालगतच्या शेतकरी व गावकऱ्यांनी केला आहे. हा पूल गावासाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र अशा पद्धतीने केलेले काम भविष्यात मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कामाची देखरेख करणारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता कानिदे व संबंधित अधिकाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी या कामाची तांत्रिक चौकशी तात्काळ कर...
Who is the mayor of Himayatnagar..? हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? सोशल मीडियावर इच्छुकांची चर्चा

Who is the mayor of Himayatnagar..? हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? सोशल मीडियावर इच्छुकांची चर्चा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावेळी नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडला जाणार असल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आरक्षण जाहीर होताच शहरात तसेच सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार चांगलाच चुरशीचा झाला आहे. हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? (Who is the mayor of Himayatnagar..?) सोशल मीडियावर इच्छुकांची जोरदार चर्चा होते आहे. शहरातील फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस, इंस्टाग्राम, टेलिग्राम यांसह स्थानिक सोशल प्लॅटफॉर्मवर “भावी नगराध्यक्ष”, “भावी नगरसेवक” अशी ओळख देत शेकडो इच्छुकांनी आपली छायाचित्रे, पोस्टर, बॅनर आणि व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या समर्थकांनी देखील ‘आमचे नगराध्यक्ष’, ‘जनतेचा नेता’, ‘आमचा उमेदवार’ भाऊच अध्यक्ष होणार..? (Discussion ...
error: Content is protected !!