Thursday, May 14

Tag: of the district administration

E-Tapalwala Seva : जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम ‘ई-टपालवाला सेवा’

E-Tapalwala Seva : जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम ‘ई-टपालवाला सेवा’

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा प्रशासनाने नागरिकाभिमुख व अभिनव असा ‘ई-टपालवाला सेवा’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. या सेवेमुळे नागरिकांना कार्यवाही बाबतची माहिती मिळविण्यासाठी कार्यालयात वारंवार येण्याची गरज राहणार नाही. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज अथवा पत्र सादर करताना त्यामध्ये स्वतःचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक नमूद करावा.यामुळे अर्जदारास त्यांनी मागितलेली माहिती घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हा अभिनव उपक्रम...
Dr. Ajit Gopchhade : जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकास कार्य गतिमान करू : खा. डॉ. अजित गोपछडे

Dr. Ajit Gopchhade : जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकास कार्य गतिमान करू : खा. डॉ. अजित गोपछडे

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचा विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आगामी काळात विकास कामे पूर्ण होतील असा विश्वास खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या नांदेड जिल्हा प्रशासन विकासकार्य आढावा बैठकीत खा. डॉ. गोपछडे बोलत होते. लोकांच्या अनेक प्रश्नांची माहिती घेऊन प्रशासनास अवगत केले. कडक उन्हाळ्यामुळे नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची सूचना केली. ग्रामीण भागात सध्या खरीप हंगामाची पूर्व तयारी चालू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी बांधवांना योग्य वेळी मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील मालगुजारी तलावातला गाळ तात्काळ काढावा यासाठी मनरेगा आणि लोकसहभागातून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत....
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी – NNL

दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी – NNL

नांदेड
नांदेड| ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार 21 जून, 2024 रोजी सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयातील विविध योग समिती, योग प्रशिक्षक, आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी, यांच्यावतीने सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्हयातील नागरीकांनी 21 जुन रोजी सकाळी 6.15 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन, एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे उपस्थित राहुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 21 जुन रोजी सकाळी 6.30 ते 8 वाजेदरम्यान सामुहिक योगा कार्यक्रमाअंतर्गत प्रार्थना चल क्रिया व खडे आसान, बैठे आसन, पोटावरचे आसन व पाठीवरचे आसन, प्राणायम ध्यान शांतिपाठ इत्यादी योग क्रिया घेण्यात येणार आहेत. योग दिन हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी श...
error: Content is protected !!