The administration is busy : लाडक्या बहिणींच्या आनंद सोहळ्यासाठी प्रशासनाची लगबग -NNL
नांदेड| सोमवार 7 ऑक्टोबरला राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळावा नांदेड येथील नवीन मोंढा मैदानावर होत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री तथा अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील अन्य मेळाव्यांपेक्षा वेगळा मेळावा व्हावा, यादृष्टिने प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.
यासाठी विविध समित्यांची नेमणूक आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून त्यासंदर्भातील आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या समित्यांच्या बैठका विभाग प्रमुखांनी आज पूर्ण केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आज या समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला असून सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी तसेच तालुकास्तरावरील यंत्रणेलाही या मेळाव्याच्या आयोजनातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरूवार 3 ऑक्टोंबरला यासंदर्भातील सर्व आढावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत घ...
