Friday, June 26

Tag: of over 500 unique Ganesh idols

Ganesh idols : ऍड दिलीप ठाकूर यांच्याकडे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह

Ganesh idols : ऍड दिलीप ठाकूर यांच्याकडे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह

नांदेड, धार्मिक
नांदेड| नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या नांदेड एस.टी. कर्मचारी गणेश मंडळाला सलग ३६ वर्षांपासून गणेशमूर्ती देण्याची अनोखी परंपरा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी जपली आहे. त्यांच्या निवासस्थानी आज सुमारे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह उभा राहिला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या गणपतीपासून, ट्रॅव्हल बॅग घेऊन प्रवासाला निघालेल्या गणपतीपर्यंत आणि मोबाईल-लॅपटॉप हाताळणाऱ्या आधुनिक गणरायापर्यंतची विविध रूपे या संग्रहात पाहावयास मिळतात. दगड, टेराकोटा, तांबे, पितळ, फायबर, संगमरवर, बोनचायना, ब्राँझ, चंदनाचे लाकूड, रुद्राक्ष, सुपारी, नारळ, अगदी दोरी यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांतून तयार झालेल्या या मूर्ती पाहणाऱ्याला थक्क करतात. नटराज गणेश, विष्णुरूपी गणेश, हनुमानरूपी गणेश, कृष्णरूपी गणेश, रथारूढ, शेषारूढ, बटुवेशातील गणराय, वाद्यवृंदरूपी, दशावतारी, भरतनाट्यममुद्रा, स...
error: Content is protected !!