‘Marathwada Bhushan’ award announced to Dr.Ashok Belkhode ; पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार किनवट येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या ता.१९ ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने २००९ सालापासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडा वासीय व पुणेकरांच्या वतीने 'मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
डॉ.बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. ते मागील तीस वर्षाहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासा...
