Five policemen in Nanded suspended : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी नांदेड मधील पाच पोलीस निलंबित -NNL
नांदेड| आज दिनांक 11.10.2024 रोजी लोहा येथील बायपास रोडवर काही पोलीस अधिकारी व अंमलदार हे बाळू वाहतूक करणारी वाहने अडवून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पैसे स्विकारत असल्याची माहिती पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाली होती.
पोलीस उप महानिरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणो थांबलेले पोलीस हे नांदेड येथील विशेष पथकात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण हलसे व इतर चार अंमलदार होते. हे सर्वजण पहाटेचे वेळी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एका खाजगी वाहनातून लोहा येथे गेले होते. उपरोक्त माहिती, त्वरित उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग कंधार श्रीमती अश्विनी जगताप यांना देण्यात येऊन, त्यांना लोहा येथे रवाना होण्याबाबत कळविण्यात आले.
मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जगताप ह्या लोहा येथे पोहोचण्यापूर्वीच, नमूद अधिकारी व अ...
