Maintain proper records : उमेदवारांच्या खर्चाचे अभिलेखे व्यवस्थित ठेवा – ऐ. गोविंदराज -NNL
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अभिलेखे व्यवस्थित ठेवण्यात यावेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनियमितपणा असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना खर्च निरीक्षक ऐ. गोविंदराज यांनी दिल्या.
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारांच्या खर्चाबाबतची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात खर्च निरीक्षक ऐ. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संपर्क अधिकारी श्रीनिवास गंगथडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, भरारी पथक समन्वयक तथा देगलूर पंचायत समिती गटविकास अधिकारी शेखर देशमुख, बिलोली गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार, सहाय्यक खर्च निरीक्षक माळी, एस. एस. रामोड, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आशिष महेंद्रक...
