Friday, June 26

Tag: Nanded Waghala Municipal Corporation

Nanded Waghala Municipal Corporation : नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक; विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  

Nanded Waghala Municipal Corporation : नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक; विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत.  निवडणूक कालावधीत विश्रामगृह वापरावरील निर्बंध - शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त, इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय...
error: Content is protected !!