Friday, May 15

Tag: Nanded district will be helped to become a hub

District Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी मदत करणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी मदत करणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कृषी, नांदेड
नांदेड| अलिकडच्या काळात शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबर निर्यातक्षम फुल पिके उत्पादकतेवर भर द्यावा. भविष्यात नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आज सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने फुल पिके उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे, मॅग्नेट प्रकल्प लातूर विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव...
error: Content is protected !!