Friday, June 26

Tag: Municipal Corporation takes measures in response to flood situation in Nanded city

Nanded ; नांदेड शहरात उद्भवलेल्या पुर परिस्थितीत महापालिकेने केल्या उपाययोजना

Nanded ; नांदेड शहरात उद्भवलेल्या पुर परिस्थितीत महापालिकेने केल्या उपाययोजना

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l मागील 3 दिवसापासुन मराठवाडा भागात भारतीय हवामान खात्याकडुन यलो अलर्ट देण्यात आलेला होता. तसेच जालना, परभणी, छत्रपती संभाजी नगर या भागामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि जायकवाडी धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडल्या मुळे विष्णूपुरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडुन 2,50,000 क्युसेक च्या प्रवाहाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असुन गोदावरी नदीने इशारा पातळी 351 मीटर ओलांडुन सध्या 352.05 मीटर ही धोका पातळी गाठलेली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम.कॉलनी, गाडीपुरा कालापुल परीसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट मल्ली परीसर, बिलाल नगर, पाकीजा नगर, शंकर नगर, वसरणी इत्यादी सखल भागातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. वसरणी मधील पंच...
error: Content is protected !!