Friday, May 29

Tag: MLAs rush to the Agriculture Minister

Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी

Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई /हिमायतनगर, अनिल मादसवार | पोटा येथील शेतकऱ्यांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही कायम असून, या आंदोलनाची दखल घेत हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी थेट कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पशुधन खरेदी अनुदान व इतर योजनांतील कथित गैरव्यवहार आणि हेराफेरीबाबत शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. रखडलेली देयके तातडीने अदा करावीत व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. आमदार कोहळीकर यांनी मंत्र्यांना भेटून संपूर्ण प्रकरण शासनदरबारी मांडल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कारभारावर आता राज्य पातळीवरून लक्ष केंद्रीत झाले आहे. मंत्रिमंडळाच्या सूचनेनंतर जिल्हा कृषी अधिकारी कोणती ठोस कार्यवाही करणार, दोषींवर कारवाई होणार का, याकडे तालुक्यातील...
error: Content is protected !!