भारतीय स्टेट बँकेचा प्रगतीशील शेतकरी मेळावा नांदेड येथे संपन्न -NNL
नांदेड। भारतीय स्टेट बँक क्षेत्रिय कार्यालय नांदेड यांचेवतीने प्रगतीशील शेतकरी मेळावा दि 21.06.2024 रोजी शहरातील नामांकित विसावा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यास शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन श्री भाऊसाहेब बारहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांचे हस्ते करण्यात आले, ह्यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बॅंकेचे उपमहाप्रबंधक श्री. प्रियकुमार सरिगला , मुख्य अतिथी श्री दिलीप दमयावार , जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड यांचेसह भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक श्री पक्काला कालीदासु, डाॅ समीर बिलोलीकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले उद्घाटनपर विचार मांडताना जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकर्यांना विविध शासकीय योजनांची माहीती दिली. तर अध्यक्षीय भाषणात श्री सरीगला यांनी कृषी दिर्घमुदत कर्जविषयक मार्गदर्शन केले तसेच शेतक...
